Latest Posts

वरोरा : अल्पवयीन मुलीला रूमवर बोलावून दोन शिक्षकांनी केला विनयभंग

– दोन्ही शिक्षकावर विनयभंग व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / वरोरा (Varora) : वरोरा शिक्षकाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अल्पवयीन मुलीला रूमवर बोलावले मुलीचा विनयभंग केला याबाबत गुरुवारी रात्री वरोरा पोलिसांनी दोन शिक्षकाविरुद्ध विनयभंग व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघेही शिक्षक फरार आहे.

वरोरा येथे प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे शिक्षक म्हणून कार्यरत आहे प्रमोद बेलेकर यांचा वाढदिवस होता त्यामुळे ती अल्पवयीन मुलगी स्टाफ रूम मध्ये प्रमोद बेलेकर याला शुभेच्छा देण्याकरिता गेली होती शुभेच्छा दिल्यानंतर प्रमोद बेलेकर याने संध्याकाळी पार्टी देतो म्हणून अभ्यंकर वार्डातील धनंजय पारखे या शिक्षकाच्या रूमवर बोलाविले त्या रूमवर धनंजय पारखे व प्रमुख बेलेकर यांनी विनयभंग केला याप्रकरणी वरोरा पोलिसात तक्रार देण्यात आली.

वरोरा पोलिसांनी प्रमोद बेलेकर व धनंजय पारखे यांच्याविरुद्ध विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघेही शिक्षक फरार आहे. वरोरा पोलीस त्यांचा शोध घेत आहे यापूर्वी अशा घटना घडल्याची चर्चा केली जात आहे. वेळीच या घटनां घडवणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई केली असती. तर अशा घटना घडल्या नसल्याचे बोलले जात आहे.

 

Latest Posts

Don't Miss