Latest Posts

वाराणसी चा भव्य फर्स्ट लूक प्रदर्शित : महेश बाबूच्या रुद्ध्र अवतारात चित्रपटाची महाकायता उलगडली

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘वाराणसी’चा शानदार फर्स्ट लूक अखेर प्रदर्शित झाला आहे. ग्लोबट्रॉटर इव्हेंटमध्ये पोस्टर आणि चित्रपटाचे शीर्षक अनावरण करण्यात आले. महेश बाबूचा भव्य आणि उग्र लूक असलेला पोस्टर प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारा ठरला आहे.

चित्रपटात महेश बाबू रुद्ध्र या शक्तिशाली आणि दैवी योद्ध्याची भूमिका साकारत आहेत. पोस्टरमध्ये त्रिशूल हाती घेतलेले आणि धावत्या बैलावर स्वार असलेले महेश बाबू त्यांच्या पात्राच्या अथांग शक्तीचा आणि महाकाय व्यक्तिमत्त्वाचा प्रतीक आहेत.

पोस्टरसोबतच चित्रपटाचा टायटल टीजरही जारी करण्यात आला आहे, ज्यात मिथॉलॉजी, अ‍ॅडव्हेंचर आणि सायन्स-फिक्शनचा अद्वितीय संगम दिसत आहे. राजामौलींनी वाराणसी ला त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या आणि महत्वाकांक्षी प्रोजेक्टमधून एक मानले आहे.

प्रियंका चोप्रा या चित्रपटातून जोरदार पुनरागमन करत आहेत. मंदाकिनी च्या भूमिकेत प्रियंका अ‍ॅक्शन-प्रधान भूमिकेत दिसणार असून, त्यांचा लूक आणि भूमिका प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी आहे. याशिवाय, पृथ्वीराज सुकुमारन कुम्भा या गूढ आणि शक्तिशाली प्रतिनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

वाराणसी हा एक महाकाव्यात्मक चित्रपट असून, त्याचे अंदाजे १ हजार कोटी रुपये बजेट आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला एक नवा जागतिक महाकाव्य मिळवून देणारा वाराणसी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Latest Posts

Don't Miss