विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballapur) : श्री गुरुदेव सेवा आश्रम, राष्ट्रसंत साहित्य अध्यायन मंडळ नागपूर, श्री गुरुदेव सेवा मंडळ नागपूर संचलित विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन वैभव कॉन्व्हेंट स्कूल येथे करण्यात आले होते.
गाव हा जगाचा नकाशा या विषयावर निंबध स्पर्धा घेतली गेली त्यात वैभव कॉन्व्हेंट शाळेतील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. या निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गुरुवार १२ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होते.
बक्षीस वितरण मध्ये निबंध स्पर्धेचे जिल्हास्तरीय समन्वयक डॉ.बंडोपत बोडेकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विनायक साळवे, प्रा.डॉ. श्रवण बाणासुरे, संस्था अध्यक्ष हेमंत मानकर, सचिव रजिया खान, मुख्याध्यापक विजय शिंदे, मुख्याध्यापिका शाबिस्ता सय्यद, फरजाना शेख, शिक्षक व विद्यार्थी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या स्पर्धेत प्रथम वरुण धीमान, द्वितीय विद्यार्थिनी अंकिता कैथल ही होती. त्यांना ग्रामगीता, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी समन्वयक डॉ. बंडोपंत बोडेकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीतेतून सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ग्रामगीतेचा अभ्यास करून आपले जीवन कसे उजळ करायचे याचा संदेश दिला.
