Latest Posts

होमगार्ड च्या रिक्त पदाच्या नोंदणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : जिल्हा होमगार्ड मधील रिक्त असलेल्या पुरूष होमगार्ड 550 व महिला होमगार्ड 342 असे एकुण 892 जागा भरण्यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन दिनांक 28 ते 30 आगस्टपर्यत पोलीस मुख्यालय नागपुर (ग्रामिण) कामठी रोड नागपुर येथे केलेले आहे. यासाठी 24 आगस्ट अखेर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असुन होमगार्ड नोंदणी माहितीपत्रक नियम व अटी याबाबत विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

तरी होमगार्ड मध्ये सेवा करून इच्छीत असलेल्या नागपूर जिल्हयातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss