विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिटट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन, सिडको आणि वेस्टर्न इंडीया फुटबॉल असोशिएशनयांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने महादेवा ही महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील युवा खेळाडूंना फुटबॉलमध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देणे हे प्रमुख उद्दीष्टे आहे.
या योजनेचा एक भाग म्हणून राज्यातील १३ वर्षांखालील मुले व मुलींसाठी जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर फुटबॉल निवड चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या निवड चाचणीमधुन निवड होणाऱ्या खेळाडूंना १४ डिसेंबर रोजी मुंबई येथे जागतीक किर्तीचे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची एक अभुतपूर्व संधी मिळणार आहे.
त्या अनुषंगाने नागपुर जिल्हयामध्ये जिल्हास्तर निवड चाचणी ३१ ऑक्टोंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल स्टेडीयम, गुज्जर लॉन समोर, पाटन चौक जवळ, सुयोग नगर, नागपूर येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
निवड चाचणी १३ वर्षाखालील खेळाडूंकरीता असून त्यांची जन्मतारीख ०१/०१/२०१२ ते ३१/१२/२०१३ पा दरम्यानची असणे आवश्यक आहे. इच्छुक खेळाडुंनी https://forms.gle/ctCMRZ4FZDxwYEvA७ या लिंकवर ऑन लाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. निवड चाचणी करीता येतांना सर्व खेळाडूंनी मुळ आधार कार्ड व जन्म तारखेचा दाखला सोचत आणणे अनिवार्य आहे. निवड चाचणीमध्ये नागपूर जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले.
