Latest Posts

कोठारी जवळ दोन ट्रक चा भीषण अपघात : एकाच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : तालुक्यातील कोठारी जवळ आज पहाटे दोन ट्रकचे टक्कर होऊन भीषण अपघात झाला. त्यात एका चालकाचा मृत्यू झाले तर दुसरा चालक गंभीर जखमी आहे. मनोज कुमार रामधनी लोधी (३४) रा. अष्ठभुजा वॉर्ड चंद्रपूर असे मृतकाचे तर पंकज मासिरकर रा खुटाळा ता. चंद्रपूर गंभीर जखमी आहे.

आज पहाटे कोठारी गोंडपिपरी मार्गावर वळण रस्त्यावर दोन ट्रक ची टक्कर झाली. ट्रक क्रं एमएच ३३ टी ३४८४ गोंडपीपरी कडुन कोठारी कडे येत असतांना देवई फाट्याचे एक कीमी अगोदर नागमोडी वळणावर ट्रक क्रं एमएच ३४ बीझेड ९१७७ चा चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी पणे चालवुन मृतकचे समोरासमोर धडक दिली त्या मुळे एमएच ३३ टी ३४८४ ट्रक ची कॅबिन अर्धी तुटुन दुसऱ्या ट्रक ला लटकुन खाली पडली त्यामुळे यातील चालक हा जागेवरच जख्मी होउन मरण पावला. व आरोपी ट्रक चालक पंकज मासिरकर सुध्दा गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.

या दोन ट्रक चा टक्कर मुळे या मार्गावरील वाहतूक काही तासाकरिता बंद होती. पुढील तपास कोठारी पोलीस स्टेशन चे ठाणेदार योगेश खरसान करीत आहे.

Latest Posts

Don't Miss