Latest Posts

ट्रक-स्कॉर्पिओ अपघातात २ ठार, ७ जखमी तर : मूल-चंद्रपूर रस्त्यावरील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : छत्तीसगड राज्यातील बंबलेश्वरी देवीचे दर्शन घेऊन चंद्रपूरकडे परतणाऱ्या स्कॉर्पिओ वाहनाला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले. ही घटना २७ ऑक्टोबर ला रात्री १० वाजताच्या सुमारास वलणी-चिचपल्ली मार्गावर घडली. मृतांमध्ये सविता श्रीकांत निंदेकर (३५) आणि हिमेश राहू मोहुर्ले (१६) रा. शिवणी (चोर) ता. चंद्रपूर यांचा समावेश असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जवळील शिवणी (चोर) येथील नितीश झाडे स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एम. एच ०६ बी. ई ने कुटुंब आणि नातेवाईकांसह छत्तीसगड जिल्ह्यातील बंबलेश्वरी येथे दर्शन करीता गेले होते. देवीचे दर्शन घेऊन काल २७ ऑक्टोबर ला चंद्रपूरला येत होतो. यादरम्यान ट्रक क्रमांक एम. एच ३४ बी. झेड ०७१५ ने जोरदार धडक दिली.

Latest Posts

Don't Miss