Latest Posts

ट्रक अपघातात चालक व वाहक गंभीर जखमी : नादुरुस्त ट्रकची पार्किंग लाईट बंद असल्याने घडला अपघात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर (Chandrapur) : चंद्रपूर – बल्लारपूर महामार्गावर नुरानी ट्रान्सपोर्ट समोर शुक्रवार, २० सप्टेंबर ला रात्री ९.३० वा नादुरस्त उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. त्यात ट्रक चालक व वाहक गंभीर जखमी झाले. जखमींना चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. सदर अपघात नादुरुस्त ट्रकची पार्किंग लाईट बंद असल्याने झाला.

नागपूरवरून सोयाबीन वेस्ट मटेरियल तेलंगणात घेवून जात असलेला ट्रक क्रं ए पी ३१ टी एच ८४२९ चंद्रपूर – बल्लारपूर महामार्गावर भिवकुंड परिसरात नादुरुस्त अवस्थेत उभा होता. मागून भर वेगात पेपर मिल येथे कागद बनविण्याचे लाकूड घेवून जाणारा ट्रक क्रं एम एच ३४ झेड २६१३ ने मागून धडक दिली. यात चालक सुशील उंदिरवाडे (३५) रा. चंद्रपूर, वाहक नेहाल तायडे (३४) रा. चंद्रपूर हे जखमी झाले.

सदर अपघात नादुरुस्त ट्रकची पार्किंग लाईट बंद असल्याने ट्रक चालकाला उभा असलेल्या ट्रकचाअंदाज आला नाही व त्याने सरळ त्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात  चालकाला व वाहकाला गंभीर दुखापत झाली व ते त्या अपघातग्रस्त ट्रकमध्ये अडकून पडले होते.

सदर अपघातची माहिती बल्लारपूर पोलिसांना दिली व मदत कार्याला सुरुवात केली. घटना स्थळी डॉक्टर व ॲम्बुलन्स बोलाविण्यात आले होते. जवळपास १ तासभर मदतकार्य सुरू होते. पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे यांनी जेसीबी व हायड्रा मागवून त्याच्या साह्याने अडकून पडलेल्यानां ट्रकमधून काढून चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. वेळीच मदत मिळाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी धाव घेतल्याने त्याचे प्राण वाचविण्यात यश आले.

घटनेची नोंद बल्लारपूर पोलिसांनी केली असून उभा नादुरुस्त ट्रक चालक अपघात होताच तिथून पसार झाले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहे.

Latest Posts

Don't Miss