Latest Posts

तलवार फिरवत दहशत पसरवणाऱ्या २ आरोपींना अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : २७ नोव्हेंबर ला रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पथक गस्त घालत असताना, यादरम्यान दोन जण हातात धारदार तलवारी घेऊन लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करून गुन्हा करण्याच्या उद्देशाने येथील सार्वजनिक रस्त्यावर बंगाली कॅम्प मुक्ती कॉलनी, चंद्रपूर अशी गुप्त माहिती मिळाली.

माहिती मिळताच प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव, रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी घटनास्थळ गाठले. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी राजेश उर्फ ​​पागड्या जानकीराम शिवणकर (४०) रा. अष्टभुजा वार्ड आणि अनिल गोरखनाथ सिंग (३२) रा. अष्टभुजा वॉर्ड यांना ताब्यात घेतले.

राजेश शिवणकर याच्याकडून स्टीलच्या हँडलसह धारदार तलवार आणि चाकु १ हजार ५०० रुपये किमतीचा जप्त करण्यात आला आहे. तर अनिल सिंग याच्याकडून ५०० रुपये किमतीची धारदार तलवार जप्त करण्यात आले आहे. दोन्ही आरोपींकडून एकूण २ हजार रुपये किमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आले असून कलम ४,२५ भारतीय शस्त्र कायदा कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अन्वये दोन्ही आरोपींविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Latest Posts

Don't Miss