Latest Posts

आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : ०१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) अंतर्गत मतदार नोंदणी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर यांचे मार्फत भंडारा जिल्ह्यातील ६०- तुमसर, ६१- भंडारा व ६२- साकोली विधानसभा मतदारसंघाचा मतदार नोंदणी बावत ऑनलाईन आढावा घेण्यात आला. निवडणूक आयोगाने ठरवून दिलल्या वेळापत्रकानुसार या प्रारुप यादीच्या आधारे ०६ ऑगस्ट २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत नवीन नाव नोंदणी फॉर्म ६, नाव दुरुस्ती फॉर्म ४ व दुबार, स्थानांतरित मतदार तसेच नाव वगळणे याकरीता फॉर्म ७ यावाचतचे दावे हरकती स्वीकारले जाणार आहे.

तरी सर्व मतदारांना आवाहन आहे की, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, तहसील कार्यालय अथवा उपविभागीय कार्यालय या ठिकाणो आपले दावे हरकती सादर करावे, या कालावधीत प्रत्येक मतदार केंद्र इमारतीच्या ठिकाणी १०, ११, १७ व १८ ऑगस्ट २०२४ रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून या दिवशी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपल्या मतदान केंद्राच्या इमारतीमध्ये दावे व हरकती स्वीकारण्याकरिता हजर असतील, याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी माहिती दिली.

त्याचप्रमाणे नागरीकांना सदर फॉर्म ऑनलाईन पध्दतीने भरण्याची सुविधा Voter Helpline App तसेच voters.eci.gov.in या मतदाता सेवा पोर्टलवर उपलब्ध असल्याबाबत माहिती देण्यात आली. सदर फॉर्म क्र. ६, ७ व ८ ऑनलाईन पध्दतीने कसे भरावे याबाबतचे तसेच ऑनलाईन ॲप वर नाव कसे शोधावे याकरीता नमूने तयार करण्यात येतील व त्याची प्रत व्यापक प्रमाणात प्रसार व प्रसिध्द करण्यात येईल याबाबतची माहिती मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी दिली. मतदार नोंदणी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर यांनी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदान केंद्रावर BLA ची नेमणूक करण्याचे आवाहन केले.

मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणानंतर ज्या मतदान केंद्राची जागा बदलण्यात आली आहे त्याबाबत जुने मतदान केंद्र, भाग क्रमांक व नविन मतदान केंद्र, भाग क्रमांक याबाबतची माहिती सर्व राजकीय पक्षांना व नागरीकांना देण्याचे निर्देश दिले. तसेच प्रारुप मतदार यादीची जास्तीत जास्त प्रमाणात प्रसिध्दी करावी व BLO यांचे कामावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे इ. निर्देश मतदार नोंदणी निरिक्षक तथा विभागीय आयुक्त, नागपूर यांनी दिले. सदर बैठकीस ११ भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार प्रशांत पडोळे व सर्व राजकीय पक्ष प्रतिनिधी उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss