Latest Posts

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी निवड चाचणी प्रवेश प्रक्रिया सुरु

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : पी.एम. जवाहर नवोदय विद्यालय पांचगाव, भंडारा) ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (जेएनव्हीएसटी) ही प्रवेश परीक्षा नवोदय समिती द्वारे घेतली जाते. इयता ६ वी सत्र २०२५- २६ प्रवेश करिता १६ जुलै २०२४ पासून नोंदणी प्रक्रिया सुरु झालेली असुन अंतिम तारीख १६ सप्टेंबर २०२४ पर्यंत देण्यात आलेली आहे.

प्रवेश परीक्षा १८ जानेवारी २०२५ ला घेण्यात येणार आहे. आवेदन करण्याकरिता https:// Navodaya.govt.in किंवा https://cbseitms.rcil.govt.in वर भेट द्यावी. केंद्र शासनाच्या नियामानुसार ७५% ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवड केली जाते. अपंग, अनु. जनजाती, अनु. जाती, मागासवर्गीय, मुलींना शासनानुसार प्राधान्य देण्यात येईल. विध्यार्थ्यांची पात्रता विध्यार्थी हा इयता ५ वी मध्ये २०२४- २०२५ मध्ये भंडारा जिल्हातील शासकीय, शासन मान्यता प्राप्त शाळेत शिकत असावा व भंडारा जिल्हातील रहिवासी असावा, आधार कार्ड अपडेट असावे, इयता ३ री व ४ थी पूर्ण शैक्षणिक वर्षभर शिकलेला असावा विद्यार्थ्यांचा जन्म १ मे २०१३ ते ३१ जुलै २०१५ दरम्यान झालेला असावा (दोन्ही तारखांसहित), प्रमाणपत्राची अचूक माहिती भरतांना यू-डायस प्लस मधील विध्यार्थांचा विध्यार्थी कोड क्रमांक हा संबंधित शाळेच्या मुख्याधापाकाकडून प्राप्त करून घ्यावा, मुख्याध्यापकांची सही व शिक्का सह प्रमाणपत्र संपूर्ण माहितीने भरून अपलोड करावे. ग्रामीण भागातील प्रतीभावान व पात्र विध्यार्थी मोठ्या संख्येने या परीक्षेस बसतील, याकरिता मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी योगदान द्यावे, असे आवाहन प्राचार्य एम.एस. बलवीर यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss