Latest Posts

येत्या आठवड्यात या राज्यांमध्ये बँका फक्त ३ दिवस सुरू :  महाराष्ट्रासह या राज्यांचा समावेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : यंदाचे आर्थिक वर्ष सुरू झालेय. बँकिंग जगतासाठी पहिल्या महिन्यातच अनेक सुट्ट्याने सुरुवात झाली. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात बँकांना तब्बल १४ सुट्ट्या असतील.

याचा परिणाम या आठवड्यात बँकांच्या कामकाजावरही होणार आहे.

आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, हा आठवडा बँकांसाठी सुट्ट्यांचा आहे. अनेक राज्यांमध्ये या आठवड्यात बँक शाखांमध्ये फक्त तीन दिवस काम असेल. याचा अर्थ संबंधित राज्यांमध्ये बँका फक्त ३ दिवस उघडतील. आठवड्यातील बहुतांश दिवस बँका बंद असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

मंगळवारपासून मालिका सुरू –
मंगळवार, ९ एप्रिल, २०२४ पासून आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी बँक सुट्ट्यांची मालिका सुरू आहे. गुढीपाडवा, उगादी, तेलुगु नववर्ष, साजिबू नोगंपनाबा (चेराओबा) आणि पहिल्या नवरात्रीसाठी मंगळवारी बँकांना सुटी असेल. वेगवेगळ्या राज्यांनुसार वेगवेगळ्या सणांमुळे बँका बंद राहतील. ज्या राज्यांमध्ये बँक शाखा मंगळवारी बंद राहतील त्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, गोवा आणि जम्मू-काश्मीरचा समावेश आहे.

१० आणि ११ एप्रिलला ईदची सुट्टी –
रमजान (ईद-उल-फित्र) निमित्त आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बुधवार, १० एप्रिल रोजी केरळमध्ये बँका बंद राहतील. गुरुवारी ११ एप्रिल रोजी देशभरातील बँकांना सुट्टी असेल. या दिवशी बँका फक्त चंदिगड, सिक्कीम, केरळ आणि हिमाचल प्रदेशात काम करतील. गुरुवारी रमजान (यु-उल-फित्र) आणि पहिला शव्वालची बँक सुट्टी आहे.

या राज्यांमध्ये फक्त ३ दिवस काम –
१३ एप्रिल हा महिन्याचा दुसरा शनिवार आहे. त्यामुळे देशभरातील बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर १४ एप्रिल रोजी बँकांमध्ये रविवारची सुट्टी असेल. अशा प्रकारे, या आठवड्यात, किमान ८ राज्यांमधील बँका फक्त ३ दिवस काम करणार आहेत. ४ दिवस बंद राहतील. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, गोवा आणि जम्मू-काश्मीर राज्यांमध्ये बँका आठवड्यातून ४ दिवस बंद राहणार आहेत.

डिजिटल बँकिंगवर परिणाम होणार नाही –
एवढ्या बँकांना सुट्या आल्या तरी ग्राहकांची अडचण टळू शकते. असे काम, ज्यासाठी बँकेच्या शाखेला भेट देणे आवश्यक आहे, सुट्टीचे कॅलेंडर पाहून आगाऊ केले जाऊ शकते. सुट्टीच्या दिवशीही डिजिटल बँकिंग आणि एटीएमद्वारे इतर अनेक बँकिंग सुविधा उपलब्ध असतील.

Latest Posts

Don't Miss