Latest Posts

एसएनडीटी महिला विद्यापीठाचे, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

– एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या नियोजित विसापूर येथील जागेवर होणार ११ मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : महाराष्ट्रामध्ये महिलांना शिक्षणाचे मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी १९१६ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची (देशातील पहिले महिला विद्यापीठ) स्थापना केली. विद्यापीठाची शतकोत्तर वाटचाल सुरू असून २०२३ मध्ये विद्यापीठाने १०७ वर्ष पूर्ण केली आहेत. या विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतलेल्या अनेक महिला या विविध क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर कार्यरत आहेत.

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नाने व उच्च व तत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष पाठबळीतून हे ज्ञानसंकुल आकार घेत आहे. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माध्यमातून सदर केंद्रा मध्ये आदिवासी व ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाच्या द्वारे आध्यावत साधन सामग्री सुरू होणार आहे.

सदर संकुलात पारंपरिक अभ्यासा बरोबरच आधुनिक व कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम राबिवले जाणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर आधारित या संकुलाची उभारणी व अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत.शिक्षणाद्वारे महिलांचे सबलीकरण करण्याचे उद्दिष्ट लक्षात घेता विद्यापीठाने शासनाच्या योजनेनुसार ग्रामीण, आदिवासी भागात उच्च शिक्षण नोंदणी दर कमी असलेल्या महिलांना कौशल्य विकास संदर्भातील अभ्यासक्रम सुरू करून तेथील स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध करण्याचा उद्देशाने बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर हा जिल्हा निवडला असून तेथे महिलांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण घेऊन त्यांचे सबलीकरण करण्याकरिता विद्यापीठाचे ज्ञान संकुल उभारण्याचे नियोजन आहे.

या ज्ञानसंकुलाचे भूमिपूजन ११ मार्च सायंकाळी ५ वाजता एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या नियोजित जागा, बोटानिकल गार्डन समोर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्री ना. चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेता विधानसभा विजय वडेट्टीवार आणि विद्यापीठाच्या कुलगुरू, प्रा. उज्वला चक्रदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

सदर ज्ञानसंकुल हे ५० एकर जागे मध्ये उभे राहणार आहे. या करिता महाराष्ट्र शासनाने ५९० कोटी रुपये मंजूर केले आहे. याकरिता कर्यानावयन यंत्रणा म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग, चंद्रपूर काम पाहणार आहे.

सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व लोक प्रतिनिधी तथा सर्व शासकीय अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नातून आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांत पाटील यांच्या पाठबळमुळे सदर चा निधी उपलब्ध होणार आहे.

विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव व अधिकारी वर्ग यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प उभा राहतोय.

Latest Posts

Don't Miss