विदर्भ न्यूज इक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय महारा अंतर्गत अनुसूचित जातीतील मांग/मातंग व या समाजातील बारा पोट जातीतील विद्यार्थी/विद्यार्थीनी करिता महामंडळामार्फत शिष्यवृत्ती योजने अंतर्गत निधीच्या उपलब्धतेनुसार शिष्यवृत्ती वितरीत करावयाची आहे. ज्या विद्यार्थी/विद्यार्थीनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात १० वी,१२ वी. पदवी, पदवीका परीक्षा मध्ये कमीत कमी ६०% किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले असतील अशा विद्यार्थी/विद्यार्थीनी महामंडळाचे जिल्हा कार्यालय भंडारा येथे शैक्षणिक कागदपत्रे, टी. सी. मार्क शीट, आधार कार्ड, राशन कार्ड, उत्पन्न दाखला, २ फोटो यासह दिनांक २५ जुलै २०२४ पर्यंत तत्काळ संपर्क साधून किंवा ऑनलाईन द्वारे जिल्हा कार्यालय भंडारा च्या ईमेल आयडी वर सुध्दा आपले अर्ज सादर करु शकता.
कार्यालयाची ईमेल आयडी siasdcbhandara@gmail.com असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ भंडारा विभागानी कळविले आहे.
कार्यालयाचा पत्ता- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा परिषद चौक, भंडारा या पत्यावर संपर्क साधावा.
