विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची नागरिकांना अधिक माहिती मिळावी आणि त्यांची कामे जलद आणि सुलभ व्हावीत यासाठी महसूल पंधरवड्यात १ ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविले जात आहे. नागरिकांनाही या पंधरवाड्याचा मोठा लाभ होत आहे.
याअंतर्गत आज युवा संवाद उपक्रमाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण आणि रोजगाराच्या अनुषंगाने मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. तुळशीरामजी गायकवाड पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय अधिकारी (ग्रामीण) आकाश अवताडे, उपजिल्हाधिकारी प्रियेश महाजन, माधुरी तिखे, तहसिलदार बाबासाहेब टेळे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला.
