विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : निवृत्तीवेतन/कुटूंबनिवृत्तीवेतन नियमित सुरू ठेवण्याकरीता बँकेमार्फत हयातीचे दाखले दिनांक ०१ नोव्हेंबर २०२४ ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सादर करावे.
अथवा www.jeevanpraman.gov.in व्दारे Digital life Certificate ची सुविधा कोषागार/उपकोषागार तसेच Common Services Centres व्दारा दाखल करता येतील. सदरचे प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ आहे. अशाप्रकारचे प्रमाणपत्र सादर न केल्यास माहे डिसेंबर २०२४ चे निवृत्तीवेतन प्रदान केल्या जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
