Latest Posts

निवडणूक खर्चासंदर्भात उमेदवारांसाठी ४ नोव्हेंबरला बैठकीचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पुर्व, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर (अ.जा.) तसेच काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी व रामटेक मतदार संघातून २०२४ ची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जात आहे. या विधानसभासाठी निवडणूक लढविणाऱ्या नामनिर्देशित उमेदवारांना चिन्ह वाटपानंतर तातडीने निवडणूक खर्चासंदर्भात आयोगाच्या सर्व कायदेशीर तरतूदी आणि सुचना, त्याची देखरेख याबाबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीत निवडणूक खर्च विषयाचे पालन न केल्यास होणारे परिणाम याबाबत मार्गदर्शन केले जाईल. सर्व उमेदवार, उमेदवारांचे खर्च प्रतिनिधीची ही बैठक, ४ नोव्हेंबर ला दुपारी २ वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस सर्व नामनिर्देशित उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, खर्च प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन खर्च सनियंत्रण कक्षा तर्फे करण्यात आले आहे.

 

Latest Posts

Don't Miss