विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ नागपूर मार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोट जातीतील कुटुंबाची सामाजिक, आर्थिक उन्नती व्हावी तसेच त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत या उद्देशाने शासनाने नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत करण्यात आले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी नावीन्यपूर्ण योजना एनएसएफडीसी योजनेंतर्गत सुरू झाल्या आहेत. यासाठी सर्व लाभार्थ्यांना https://beta.slasdc/org या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. अर्ज सादर केल्यानंतर त्याच्या तीन प्रती मुळ कागदपत्रांसह महामंडळाच्या कार्यालयात सादर कराव्यात. अर्ज १५ एप्रिलपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी महामंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, दक्षिण अंबाझरी रोड येथील जिल्हा कार्यालय किंवा ०७१२-२२४९३५५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
