Latest Posts

रेल्वेच्या धडकेत रानगव्याचा मृत्यू : चंद्रपूर – ब्रह्मपुरी रेल्वे मार्गावरील घटना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटातील कक्ष क्रमांक ९७ लगत चंद्रपूर-ब्रह्मपुरी रेल्वे मार्गावर रेल्वेने दिलेल्या धडकेत रानगव्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी २ ला सकाळी गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आली. वनविभागाचे निदर्शनास कर्मचारी शनिवारी सकाळच्या सुमारास तळोधी वनपरिक्षेत्रातील आलेवाही बिटात गस्तीवर असताना रेल्वेरूळावर रानगवा मृतावस्थेत आढळून आला.

ही माहीती तत्काळ वनविभागाला देण्यात आली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता मृत रानगवा अंदाजे तीन वर्षे वयाची मादा असल्याचे लक्षात आले. तिला मागील भागावर रेल्वेने धडक दिल्यामुळे रेल्वे रुळाच्या बाजूला पडून डून तिचा मृत्यू झाला. यानंतर सिंदेवाही नवरगाव येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुरपाम यांच्या हस्ते शवविच्छेदन करून जेसीबीच्या साह्याने खड्डा करून रानगव्याला घटनास्थळी पुरविण्यात आले. यावेळी सहाय्यक उपवन संरक्षक महेश गायकवाड, वनपरिक्षेत्राधिकारी अरुप कन्नमवार, स्वॉबचे प्रतिनिधी यश कायरकर, क्षेत्र सहाय्यक अरविंद मने, वनरक्षक राजेंद्र भरणे, वनरक्षक पंडित मेकेवाड, पी. आर.टी. सदस्य व वनमजूर आदी उपस्थित होते.

अंडरपास असणे गरजेचे –

या बाबत यश कायरकर, वन्यजीव अभ्यासक यांनी म्हंटले की मिंडाळा ते चंद्रपूरपर्यंत जवळपास शंभर किलोमीटर पर्यंत घनदाट जंगलातून ब्रह्मपुरी-चंद्रपूर हा रेल्वे मार्ग गेलेला आहे. त्यामुळे या रेल्वे रूटवर सतत अशाप्रकारे वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटना घडत असतात. त्यामुळे वन विभाग, रेल्वे प्रशासन व शासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्राण्यांना रेल्वेलाइन खालून ये-जा करण्याकरता काही मीटर अंतरावर अंडरपास असणे गरजेचे आहे.

Latest Posts

Don't Miss