विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia): पोलीस स्टेशन रामनगर कार्यक्षेत्रातील तीन सराईत गुन्हेगारांना उपविभागीय दंडाधिकारी, गोंदिया यांनी हद्दपार (तडीपार) केले. पो. ठाणे रामनगर कार्यक्षेत्रांतर्गत राहणारेसराईत गुन्हेगार राहुल दिनेश सिंह बरेले (२०) रा.कॉलेज टोली कुडवा. प्रवेश उर्फ छोटु नरेंद्र मेश्राम (२४) रा. वार्ड क्र.३ कुडवा गोंदिया यांना तीन महिन्यांच्या कालावधी करीता हद्दपार करण्यात आले असून सराईत गुन्हेगार शहाबाज उर्फ बंदे शब्बीर खान पठाण (३१) रा.इंदिरा गांधी वार्ड रेलटोली गोंदिया यास दोन महिन्याच्या कालावधी करीता गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर जिल्ह्याचे हद्दीबाहेर हद्दपार (तडीपार) करण्यात आले आहे.
नमूद गुन्हेगारांवर मालमत्तेविषयी, शरीराविरुद्ध, जातीय तेढ निर्माण करण्यासारखे गुन्हे नोंद असुन यांचे गुन्हेगारी कृतीमुळे गावात सर्व सामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने परिसरातील आणि जिल्ह्यातील नागरीकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवरात्रोत्सव, दिवाळी सण व आगामी होणारी विधानसभा सार्वत्रीक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था अबाधीत राहावी, वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा गुन्हेगारांवर वचक बसावा, तसेच गुन्हेगाराचे गुन्हेगारी प्रवृत्तीना कोणताही थारा दिला जात नाही हा संदेश जनमानसात जावा म्हणुन कारवाई करण्यात आली आहे.
नमूद गुन्हेगारांवर केलेल्या हद्दपारीच्या कारवाई मुळे परिसरातील जनतेत आनंदाची भावना निर्माण झाली आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक गोंदिया गोरख भामरे अपर पोलीस अधिक्षक नित्यानंद झा, यांचे निर्देशांन्वये उप.वि.पो. अधिकारी, गोंदिया रोहिणी बाणकर मॅडम यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांनी तसेच पो. उप. नि. अमोल वाघमोडे, स.फौ.राजेश भुरे,पो. हवा राजेश भगत यांनी केली आहे.
