– २५ जुलै रोजी यलो अर्लट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : वर्धा शहरात आणि परिसरात बुधवारी पावसाची हजेरी कायम होती. सकाळच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा असणारा पाऊस दुपारनंतर चांगलाचा बरसला. जुलै 2024 मध्ये 438.0 मि.मी सरासरी पर्जन्यमान झाले आहे. 25 जुलै रोजी यलो अर्लट दिला आहे. पुलावरून पाणी वाहत असताना पुल ओलांडण्याचा नागरिकांनी प्रयत्न करून नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
आजचे पर्जन्यमान –
24 जुलै रोजी सरासरी पर्जन्यमान आर्वी तालुक्यातील 6 मंडळात एकुण 26.7 मि.मी., कारंजा तालुक्यातील 4 मंडळात 11.8 मि.मी., आष्टी तालुक्यातील 4 मंडळात 17.8 मि.मी., वर्धा तालुक्यातील 7 मंडळात 15.8 मि.मी., सेलू तालुक्यातील 5 मंडळात 12.1 मि.मी., देवळी तालुक्यातील 6 मंडळात 43.3 मि.मी., हिंगणघाट तालुक्यातील 10 मंडळात 22.6 मि.मी. व समुद्रपूर तालुक्यातील 8 मंडळात 12.6 मि.मी. सरासरी पाऊसाची नोंद झाली असून जिल्ह्यातील 48 मंडळात एकुण 20.7 मि.मी. सरासरी पाऊसाची नोंद झाली आहे.
नद्यांची पाणी पातळी –
समुद्रपुर तालुक्यातील धाम नदीच्या हमदापूर येथील 224.80 पाणी पातळी क्षमता असून सध्याची पाणी पातळी 218.52 मीटर असून 224.12 क्युमेस विसर्ग सुरु आहे. हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट येथील 214.240 पाणी पातळी असुन सद्या 204.37 पाणी पातळी असुन 182.08 क्युमेस विसर्ग सुरु आहे. तर देवळी तालुक्यातील सिरपुर येथील पाणी पातळी 238.00 असुन सद्याची पाणी पातळी 231.12 मीटर असुन 803.900 क्युमेस विसर्ग सुरु आहे.
प्रकल्पाची पाणी पातळी –
बोर प्रकल्पाचा एकुण जलसाठा 134.542 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 52.50 टक्के, निम्न वर्धा प्रकल्पाचा 253.340 द.घ.ल.मी एकुण जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 63.42 टक्के, धाम प्रकल्पाचा 69.435 द.घ.ल.मी एकुण जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 90.01 टक्के, पोथरा प्रकल्पाचा एकुण जलसाठा 38.420 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100.02 टक्के असून 59.420 क्युमेस विसर्ग सुरू आहे. पंचधारा प्रकल्पाचा एकुण जलसाठा 9.680 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100 टक्के असून 12.700 क्युमेस विसर्ग सुरू आहे. डोंगरगाव प्रकल्पाचा एकुण जलसाठा 4.810 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100.09 टक्के असून 1.736 क्युमेस विसर्ग सुरू आहे. मदन प्रकल्पाचा 11.460 द.घ.ल.मी जलसाठा असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 85.87 टक्के, मदन उन्नई प्रकल्पाचा जलसाठा 3.720 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 100 टक्के असून 8.290 क्युमेस विसर्ग सुरू आहे, लालनाला जलसाठा 29.515 द.घ.ल.मी असुन 54.28 टक्के असून 5 गेट 10 से.मी. उघडे आहे. वर्धा कार नदी प्रकल्प जलसाठा 25.962 द.घ.ल.मी असुन 100 टक्के असून 18.551 क्युमेस विसर्ग सुरू आहे व सुकळी लघू प्रकल्पाचा जलसाठा 11.920 द.घ.ल.मी असुन 100 टक्के भरलेले असून 12.220 क्युमेस विसर्ग सुरू आहे.
इतर प्रकल्पाची पाणी पातळी –
नांद प्रकल्पाचा एकुण जलसाठा 62.182 द.घ.ल.मी असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 37.10 टक्के असून 39.560 क्युमेस विसर्ग सुरू आहे. वडगाव प्रकल्पाचा जलसाठा 151.496 असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 65.07 टक्के असून 123.149 क्युमेस विसर्ग सुरू आहे. उर्ध्ववर्धा प्रकल्प जलसाठा 678.270 असुन उपयुक्त साठ्याची टक्केवारी 59.51 टक्के व बेंबळा प्रकल्पाचा जलसाठा 203.330 असुन 48.92 टक्के भरलेले असून 258.000 क्युमेस विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यात एकाही गावाचा संपर्क तुटलेला नसून वर्धा राळेगाव मार्गावरील देवळी तालुक्यातील सरुळ येथील पुलावरुन पाणी वाहत आहे. बोरगाव ते अलोडा, भोजनखेडा आणि निमसडा येथील पुलावरुन पाणी वाहत आहे. कारंजा तालुक्यातील ढगा ते ब्राम्हणवाडा रस्ता बंद आहे. आर्वी तालु्क्यात 7 घरांचे अंशत: नुकसान झाले असून वर्धा तालुक्यात 1 घर पुर्णत: व 1 घराचे अंशत: नुकासान झाले आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
