Latest Posts

रब्बीतही मिळणार १ रुपयात पीक विमा : १ नोव्हेंबरपासून सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : राज्य सरकारने २०२३ पासून खरीप आणि रब्बी हंगामात एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर यंदाही रब्बी हंगामातील पिकांसाठी एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

याकरीता १ नोव्हेंबरपासून गहू, हरभरा, कांदा व ज्वारीसाठी विमा काढता येणार आहेत. गेल्यावर्षी या योजनेत ७१ लाख ४१ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून ४९ लाख ४५ हजार हेक्टरवरील पिकांचा विमा उतरवला होता. मागील वर्षी पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवत असून यंदाच्या रब्बी हंगामातही ती सुरू आहे. २०२२-२३ मध्ये७.४५ लाख अर्जदारांनी सहभाग हा घेतला होता. तेव्हा ५ लाख हेक्टर क्षेत्र होत ते यंदा ४९ लाख म्हणजे जवळपास १० पटीने वाढले आहे. परतीचा पाऊस पडला असून पाण्याची देखील चांगली उपलब्धता आहे. तर रब्बी हंगामातील क्षेत्र हे ५४ लाख इतके आहे.

यंदाच्या वर्षी हे ६० लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. यात शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे. यात कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा प्रमुख पीक असून उन्हाळी भात आणि भुईमूग यामध्ये ते सहभाग घेऊ शकतात. सहभाग घेण्यासाठी केंद्र सरकारचे पोर्टल www.pmfby.gov.in वर जाऊन ते स्वतः देखील आपला अर्ज करू शकतात.

Latest Posts

Don't Miss