Latest Posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या विविध योजनाकरिता अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : जिल्हातील भज-क या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीतील १८ ते ६० वयोगटातील लाभार्थीसाठी खालील योजनेकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज www.mahamesh.orgया संकेतस्थळावर २६ सप्टेंबरपर्यंत मागविण्यात येत आहे.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना : स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधेसह २० मेंढया + १ मेंढा नर अशा मेंढीगटाचे ७५ टक्के अनुदानावर वाटप केले जाणार आहे. या योजनेअंतर्गत मेंढी गटवाटप योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु स्वतः च्या मेंढया आहेत. अशा लाभार्थ्यांसाठी खालील घटकांचा समावेश आहे.

सुधारित प्रजातींच्या नर मेंढयांचे ७५ टक्के अनुदानावर वाटप होईल. मेढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान, मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदान आहे.

मेंढ्यासाठी चराई अनुदान : ज्या मेंढपाळ कुटुंबाकडे किमान २० मेंढ्या व १ मेढा नर एवढे पशुधन आहे, अशा कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीसाठी प्रतिमाह ६ हजार रुपये असे एकूण २४ हजार रुपये चराई अनुदान वाटप केले जाईल.

कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान : चार आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या १०० कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी कमाल ९ हजार रुपयेच्या मर्यादित ७५ टक्के अनुदान दिले जाईल.

मेंढी- शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान : भूमिहीन मेंढपाळ कुटुंबातील कोणत्याही एका सदस्यास अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढी शेळी पालनाकरिता जागा खरेदी करण्यासाठी जागेच्या किमतीच्या ७५ टक्के अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम एकवेळेचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल ५० हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येते.

Latest Posts

Don't Miss