Latest Posts

पुणे जिल्ह्यात एक लाख एकल महिलांची नोंद : आरोग्य तपासणी आणि साक्षरतेसाठी मदतीची गरज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे (Pune): जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, पुणे जिल्ह्यात एक लाख नऊ हजार एकल महिलांची नोंद झाली आहे. त्यामध्ये २८ हजार ७६१ महिलांना आरोग्य तपासणी व मोफत उपचाराची गरज असल्याचे समोर आले आहे. तसेच, ५४ हजार ८९१ महिलांना साक्षर करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे.

याच प्रमाणे, या महिलांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषदेने माझे अस्तित्व हा विशेष प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एकल महिलांना सातबाऱ्यावर नाव नोंदवणे, घरकुल कागदपत्रे, रेशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आदी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिली जात आहेत. यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी विशेष शिबिरांचे आयोजनही करण्यात आले आहे.

सर्वेक्षणानुसार, पुणे जिल्ह्यात एकल महिलांच्या जीवनातील सर्वात मोठ्या गरजा आरोग्य तपासणी, घरकूल उपलब्ध करणे, कृषी आधारित व्यवसाय सुरू करणे, आणि मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची आहेत. ५४ हजार ८९१ महिलांना साक्षरतेसाठी मदतीची आवश्यकता असून, २८ हजार ७६१ महिलांना आरोग्य तपासणी व मोफत उपचार मिळवण्यासाठी सहाय्याची गरज आहे.

तालुकानिहाय एकल महिलांची संख्या –
खेड: ११,८३३, आंबेगाव: ११,८२५, इंदापूर: ९,९८४, बारामती: ९,७५६, दौंड: ९,२४९, पुरंदर: ८,८८९, मावळ: ७,८६१, जुन्नर: ७,५३७, हवेली: ६,६६९, मुळशी: ५,५३७, शिरुर: ५,११३, भोर: ५,०६५, राजगड (वेल्हे): १,७०१

वैवाहिक स्थिती –
– विधवा: ९०,१६९, परितक्त्या: ६,८९८, घटस्फोटीत: १,६६४, अविवाहित: १,६४७, अनाथ: ६३१
या सर्वेक्षणानुसार, एकल महिलांच्या आरोग्य, साक्षरतेसह अनेक क्षेत्रांत मदतीची आवश्यकता स्पष्ट झाली आहे, आणि यासाठी जिल्हा परिषदेने योग्य पावले उचलली आहेत.

Latest Posts

Don't Miss