विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीची दखल घेऊन, रेल्वेने नागपूर ते दानापूर या मार्गावर एकमार्गी विशेष गाडी (गाडी क्रमांक ०१२०३) चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडीचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत –
गाडी क्रमांक ०१२०३ : नागपूर – दानापूर एकमार्गी विशेष
नागपूर प्रस्थान : २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. १६.३० वाजता
दानापूर आगमन : २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं.१६.०५ वाजता
थांबे: आमला, जुन्नारदेव, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छेओकी, न्यू वेस्ट केबिन, दीनदयाल उपाध्याय जं., बक्सर, आरा
रचना: ६ सामान्य डबे, ५ द्वितीय श्रेणी चेयर कार, ५ स्लीपर डबे, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन. वरील विशेष गाडीचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले आहे.
थांब्यांवरील वेळापत्रकाबाबत सविस्तर माहितीसाठी http://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES App डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष गाडीचा लाभ घ्यावा व गैरसोय टाळण्यासाठी वैध तिकीटासह प्रवास करावा.
