Latest Posts

प्रतिबंधित अवैध विक्रीकरीता आणलेला सुगंधित तंबाखु जप्त : स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुरची धडक कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांची पोलीस स्टेशन वरोरा हद्दीत प्रतिबंधित अवैध विक्री करीता आणलेल्या सुगंधित तंबाखु तस्करांवर धडक कारवाई करीत सुगंधित तंबाखू सह कार सहित २१ लाख २७ हजार ६०० मुद्देमाल जप्त केले.

१४ मार्च २०२४ रोजी रात्री गोपनिय माहीतीगार यांनी खात्रीशीर माहिती दिली की, पो.स्टे. वरोरा परीसरात रात्रोगस्त करीत असता मुखबिरद्वारे खबर मिळालो की, नागपुर येथून गाडी क्र. एम.एच. ३४ सि.डी. ८५४० या पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये महाराष्ट्र प्रतिबंधित केलेला सुगंधित तम्बाकू चा साठा भरुन चंद्रपुर कडे अवैधरित्या विक्रीसाठी वाहतुक करीत आहे अश्या खात्रीशीर खबरेवरुन नंदोरी टोल नाका ता. वरोरा येथे नाकाबंदी केली असता सदर वाहनाची झडती घेतली असता कि. ५ लाख ७७ हजार ६०० रु. चा शासनाने प्रतिबंधित केलेला सुंगधित तंबाखू, १५.5५० हजार कि. चे आरोपीचे ताब्याती टोयोटा कंपनिची गाडी व दोन मोबाईल असा एकुण २१ लाख २७ हजार ६०० रुपये चा माल जप्त करण्यात आला. सदर तंबाखू हा शासनाने प्रतिबंधित केलेला असल्याने आरोपी यांनी अवैधरित्या विक्रीकरीता वाहतुक करीत असता मिळुन आल्याने आरोपी नामे मुकेश नगिनभाई कातरानी (४६) धंदा चालक व एक महीला दोन्ही रा. वार्ड क्र. ६ नेरी, दुर्गापुर ता.जि. चंद्रपुर यांचे विरुध्द पो.स्टे. वरोरा अप.क्र. /२०२४ कलम ३२८, १८८, २७२, २७३, ३४ भादेवी सह कलम ३०(२), २६(२) (अ), ३, ४, ५९(१) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील कायदेशोर कारवाई करणेकरीता जप्त मुद्देमाल व आरोपी नामे मुकेश नगिन कातरानी (४६) वर्षधंदा चालक व एक महोला दोन्ही रा. वार्ड क्र. ६ नेरी, दुर्गापुर ता.जि. चंद्रपुरांना पो.स्टे. वरोरा यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखालो पो.नि. महेश कोंडावार यांचे आदेशाने सपोनि मनोज गदादे, सपोनि किशोर शेरको यांचे गोपनिय माहीतीवरुन सपोनि गदादे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, गजानन नागरे, अजय बागेसर, पोअं. प्रशांत नागोसे चापोहवा दिनेश अराडे सह स्थागुशा चंद्रपुर सायबर पोलीस स्टेशन चे पोअं उमेश रोडे, पो.स्टे. वरोरा येथील मपोशि किर्ती ठेंगणे यांनी सापळा रचुन यशस्वीरीत्या कारवाई केली.

Latest Posts

Don't Miss