Latest Posts

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी करुन घ्यावी

– ५ लाखापर्यंतचे उपचार, शस्त्रक्रिया मोफत

–  कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती योजनेस पात्र

– उपचाराकरीता जिल्ह्यातील नऊ रुग्णालयाचा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : केंद्र शासनाची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आता प्रत्येक कुंटूंबाकरीता लागू करण्यात आलेली आहे. योजनेंतर्गत केशरी, अंत्योदय अन्नपूर्ण पिवळे व शुभ्र शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांचा सुध्दा समावेश करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेचे १२ लाख ५२ हजार लाभार्थी असून यापैकी ४ लाख २० हजार ४०९ लाभार्थ्यांची आतापर्यंत केवायसी झालेली असून उर्वरीत ८ लाख ३१ हजार ९२० लाभार्थ्यांची अद्यापपर्यंत केवायसी होणे बाकी आहे. यासाठी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप पर्यंत केवायसी केलेली नाही अशा लाभार्थ्यांनी तात्काळ केवायसी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

योजनेंतर्गत लाभार्थ्यांना जिल्ह्यातील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, कस्तुरबा हॉस्पीटल सेवाग्राम, जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय आर्वी, उपजिल्हा हिंगणघाट, ग्रामीण रुग्णालय कारंजा, डॉ. लोढा ऑर्थोपेडिक हॉस्पीटल हिंगणघाट, डॉ. राणे ऑर्थोपेडीक हॉस्पीटल आर्वी, अरिहंत डायलिसिस सेंटर हिंगणघाट या रुग्णालयाला उपचाराकरीता अधिकृत करण्यातआले आहे.

संबंधीत रुग्णालयामध्ये भरती झालेल्या रुग्णाला १ हजार ३५६ प्रकारचे ५ लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार केले जाणार आहे. यामध्ये डायलिसिस, हाड मोडल्याचे ऑपरेशन, गुडघा व कमरेचा हाडाचे प्रत्यारोपण, मेंदूचे ऑपरेशन, हृदयाचे ऑपरेशन, कॅन्सर सर्जरी, किमाथेरपी व रेडिएशन गर्भाशयाच्या ऑपरेशन इत्यादीचा समावेश आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे आयुष्मान भारत कार्ड तयार करुन असणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी आपले आयुष्मान कार्ड बनवून घ्यावे, असे जिल्हा शल्य चिकित्सक  यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss