Latest Posts

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्यावतीने बालशक्ती पुरस्कार दिला जातो. सन २०२५ साठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी बालक व संस्थांनी १५ सप्टेंबर पर्यंत www.awards.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन अर्ज सादर  करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी मुलांचे वय ५ ते १८ वर्षापर्यंत असावे, शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविण्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य  अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली असावी.

पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर स्वत:मुले किंवा त्यांच्या वतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी, जिल्हादंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था अर्ज करु शकतात, असे जिल्हा महिला व बाल विकास विभागाने कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss