Latest Posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल पुरस्काराने सन्मानित

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : रशियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेथील सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला आहे. मंगळवारी ९ जुलै ला पीएम मोदींना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल देण्यात आला.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वतः हा सन्मान पंतप्रधानांना दिला. हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळविणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय नेते आहेत.

२०१९ मध्ये पीएम मोदींना ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत-रशिया संबंधांना चालना देण्यासाठी क्रेमलिनच्या सेंट अँड्र्यू हॉलमध्ये एका विशेष समारंभात पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला.

२०१९ मध्ये भारतातील रशियन दूतावासाने जाहीर केले होते, १२ एप्रिल रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशिया आणि भारत यांच्यातील विशेष धोरणात्मक भागीदारी आणि रशियन आणि भारतीय यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी अपवादात्मक सेवांसाठी ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल हा पुरस्कार देण्यात येईल, असे घोषित केले होते.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देखील २०१९ मध्ये होते, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियासोबत भागीदारी वाढवण्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू प्रदान करण्याची घोषणा केली होती.

विशेष बाब म्हणजे या पुरस्काराची स्थापना ३०० वर्षांपूर्वी झाली. ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू हा रशियाचा सर्वोच्च सन्मान आहे, ज्याची स्थापना रशियाचा पहिला सम्राट पीटर द ग्रेट याने १६९९ च्या सुमारास केली. १९१८ मध्ये रशियन क्रांतीनंतर ते रद्द करण्यात आले आणि नंतर १९९८ मध्ये रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकारी आदेशाने हा पुरस्कार देण्याची पुन्हा घोषणा करण्यात आली होती.

Latest Posts

Don't Miss