Latest Posts

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २१ वा हप्ता लाभ वितरण कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): माननीय पंतप्रधान यांच्या शुभहस्ते शनिवार १९ नोव्हेंबर २०२५ रोजी तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथून पी. एम. किसान योजनेतील लाभार्थीच्या आधार संलग्न बँक खात्यात योजनेच्या २१ व्या हप्त्याचा लाभ वितरित होणार आहे. याच कार्यक्रमात माननीय पंतप्रधान यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २१ हप्त्याचे वितरण थेट आधार संलग्न खात्यावर एक क्लिकवर होणार आहे. पी. एम. किसान योजने अंतर्गत रु.२ हजार /- चा लाभराज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा होईल.

त्या अनुषंगाने सदर समारंभामध्ये तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र तसेच जिल्हा, तालुका व ग्राम पंचायत स्तरावर, कृषी उत्पन्न बाजार समिती, विविध कार्यालये, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपनी (FPCs), शेतकरी उत्पादक संघटना (FPOs), ग्रामस्तरावर हा कार्यक्रम स्थानिक कृषि व महसुल विभागाच्या अधिकारी, सहकारी पत संस्था (PACS) याठिकाणी सदरचा समारंभ आयोजित करून सदर समारंभ यशस्वी होण्यासाठी https://pmindiawebcast.nic.in या लिंक चा वापर करून स्थानिक जास्तीत जास्त शेतक-यांना ऑनलाइन पद्धतीने सहभागी करून घ्यावे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी सदर कार्यक्रमामध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणे बाबत आवाहन प्रीती हिरळकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss