विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपुर (Nagpur) : वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी ऑनलाईन सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.
यापुर्वी वाहन मालकास पसंती क्रमांक घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात येवून फी भरणा करावे लागत असे, त्यानंतर त्यांचा पसंती क्रमांक त्यांना आरक्षीत करता येत असे. परंतु आता ही सुविधा ऑनलाईन करण्यात आल्याने वाहन मालकास कार्यालयात न येता ऑनलाईन पसंती क्रमांक आरक्षीत करता येणार आहे. एनआयसीद्वारे एफसीएफएस ही सुविधा उपलब्ध केली आहे.
अशी करा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी –
अर्जदाराने parivahan.gov.in या संकेतस्थळावर जावून ऑनलाईन सर्व्हिस हा पर्याय निवडून त्यास फॅन्सी नंबर बुकींग ही सुविधा देण्यात आलेली आहे. यामुळे वाहनमालक/अर्जदार यांना कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर पुर्व) यांनी केले आहे.
