विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai): पवईतील एका स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलीस ठेवून, त्यांचं जीव वाचवताना झालेल्या गोळीबारात मृत्यू झालेल्या रोहित आर्या याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाची योजना रोहित आर्याने अनेक दिवसांपासून केली होती. त्याने ज्या घरात राहत होता, त्या घरमालकासोबत देखील त्याचे वाद झाले होते.
घरमालकाशी वाद आणि मानसिक ताण –
वृत्तानुसार, रोहित आर्या आणि त्याची पत्नी अंजली आर्या हे पुण्यातील कोथरूड येथील एका भाड्याच्या घरात राहत होते. २८ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी ३६ महिन्यांचा भाडे करार केला होता, मात्र काही दिवसांतच शेजाऱ्यांच्या तक्रारींमुळे घरमालकाने त्यांना घर सोडण्याची नोटीस दिली. २ मार्च २०२५ पासून भाडे न भरल्याने आणि अनेक वादांनंतर घरमालकाने त्यांच्याशी मध्यस्थी केली आणि ते घर रिकामे केले.
सुडाची भावना आणि मानसिक ताण –
घर सोडल्यावर, रोहित आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. या मानसिक ताण आणि सूडाच्या भावनेमुळे त्याने मुलांना ओलीस ठेवण्याचा कट रचला, असा प्राथमिक तपासात निष्कर्ष काढला आहे.
पोलिस तपास आणि पुढील खुलासे –
पोलिसांनी देशपांडे यांच्या कडून मिळालेल्या सर्व कागदपत्रांची छाननी केली आहे. तसेच, रोहित आर्या याच्या पार्श्वभूमी, मानसिक स्थिती आणि त्याने मोठ्या कट रचणाऱ्या नेटवर्कबद्दल तपास सुरू केला आहे.
प्रारंभिक तपासानुसार, रोहितच्या कुटुंबाच्या अडचणी आणि त्याचा सूड घेण्याची भावना या प्रकरणाच्या मूळ कारणांपैकी एक असू शकते. पोलिस अधिक तपास करत असून, अजून काही खुलासे होण्याची शक्यता आहे.
