विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : मा. भारत निवडणूक आयोगाने जिल्हयातील ६०-तुमसर, ६१-भंडारा व ६२-साकोली विधानसभा मतदारसंघाच्या मतदार केंद्राच्या प्रस्तावास मान्यता दिली असून सदर मतदान केंद्रांची यादी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय, मतदार नोंदणी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात तसेच तहसिलदार कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत या ठिकाणी पहावयास उपलब्ध होतील.
तसेच https:bhandara.gov.in या वेबसाईटवर देखिल पाहण्यास उपलब्ध आहेत. तरी मतदारांनी आपले मतदान केंद्र, मतदानाचे पुर्वी तपासुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,योगेश कुंभेजकर यांनी कळविले आहे.
