विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२४-२५ पिक विमा भरण्याची कार्यवाही सामुहिक सेवा केंद्र (CSC/VLE) केंद्रामार्फत केली जात आहे. यासाठी केंद्रशासनाने प्रति शेतकरी रूपये ४० शुल्क निर्धारित करून दिले असून ते संबंधित विमा कंपनी मार्फत सामुहिक सेवा केंद्र (CSC/VLE) यांना दिले जाते.
सर्व (CSC/VLE) धारकांनी पिक विमा अर्ज भरतांना शेतकरी यांचेकडून प्रति अर्ज केवळ 1 रूपये शुल्क आकारण्यात यावे.
सामुहिक सेवा केंद्र (CSC/VLE) चालक जास्तीचे शुल्क आकारत असतील तर शेतकऱ्यांनी टोल फ्रि क्र.- १४५९९/१४४४७ किंवा Email Id : support@csc.gov.in किंवा व्हॉट्सअप क्र.- ९०८२६९८१४२ किंवा फोन नं.- ०११- ४९७५४९२३ यावर तक्रार नोंद करावी, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, संगीता माने यांनी कळवले आहे.
