विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : CBSE Board Result जवळपास सर्व राज्यांच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल आले आहेत. काही राज्यांच्या बोर्ड परीक्षांचे निकाल येणे बाकी आहे. यामध्ये केंद्रीय बोर्ड सीबीएसईचाही समावेश आहे.
सीबीएसईच्या १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षा यावर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान झाल्या होत्या. आता जवळपास ३८ लाख विद्यार्थी सीबीएसई बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या तारखेची वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार असून सीबीएसईने १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल तयार केले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई त्यांच्या १० वी आणि १२ वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर करणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल १० ते १५ मे दरम्यान जाहीर होऊ शकतात. सीबीएसई १० वी आणि १२ वीच्या परीक्षांचे निकाल वेगवेगळ्या तारखांना जाहीर होतात. CBSE Board Result विद्यार्थी results.cbse.nic.in आणि cbse.nic.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. याशिवाय सीबीएसई बोर्ड परीक्षेचे निकाल उमंग ॲप, परीक्षा संगम पोर्टल आणि डिजीलॉकरवरही पाहता येतील. विद्यार्थी संबंधित परीक्षेच्या लिंकवर क्लिक करून त्यांचे रोल नंबर आणि कॅप्चा इत्यादी देऊन त्यांची मार्कशीट डाउनलोड करू शकतील.
