विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यात 258 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येत असून आपले सेवा केंद्र सुरू करणाऱ्या इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. काही तांत्रिक कारणामुळे आपले सेवा केंद्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंकमध्ये बदल करण्यात आला असून https://forms.gle/XSqsXxHBqjQvX8AN8 ही लिंक नव्याने सुरू करण्यात आली आहे.
यापुर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुनश्च अर्ज करू नये. ऑनलाईन अर्ज ८ ऑगस्ट २०२४ रात्री १२ वाजेपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
