विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : ग्रामीण व नागरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी तसेच नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात आपले सेवा केंद्र उपयुक्त ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आपले सेवा केंद्र सुरू करणाऱ्या इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यात २५८ आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येत असून इच्छुक अर्जदारांनी wardha.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या https://forms.gle/bQ5Pq9phigCriQbb7 लिंकवर ऑनलाईन अर्ज ८ ऑगस्ट २०२४ पर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
