Latest Posts

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : राज्यातील अल्पसंख्यांक समुदायातील ७५ विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अल्पसंख्यांक प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होय. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

सदर योजनेंतर्गत (Qs World University Ranking) २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या  विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. विद्यार्थ्याने विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह, समाज कल्याण आयुक्तालय ३, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- ४११००१ या पत्यावर सादर करावा. या योजनेसंबंधी शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ताज्या घडामोडीमध्ये विस्तृत माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएचडीसाठी ४० वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी. या योजनेंतर्गत अल्पसंख्याक समुदायातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss