Latest Posts

शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहिर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२४ चे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. परीक्षा १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. असून परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असून उमेदवारास ३० सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.

ईयत्ता १ ली ते ८ वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळ, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विना अनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या परीक्षेशी संबंधीत शासननिर्णय, अनुषगिक माहिती, सुचना  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेचे वेळ, व इतर सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

शिक्षक पात्रता परिक्षेसाठी उमेदवारांना ३० सप्टेंबर पर्यंत अर्ज भरता येणार असून प्रवेशपत्राची २८ ऑक्टोंबर ते १० नोव्हेंबर पर्यंत ऑनलाईन प्रिंन्ट काढता येणार आहे. परिक्षेचा पहिला पेपर १० नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते १ वाजे पर्यंत व दुसरा पेपर दुपारी २ ते ४.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे चे उपायुक्त यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss