Latest Posts

मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती सादर करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : जिल्हयातील सेवायोजन कार्यालये कायदा,१९५९ व नियम १९६० च्या कलम ५(१) अन्वये सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय, तसेच खाजगी क्षेत्रातील कायद्यांतर्गत असणाऱ्या आस्थापनांना त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची पुरुष, स्त्री व एकूण अशी सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीस विहीत नमुना ईआर-१ मध्ये नियमितपणे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने सादर करणे बंधनकारक आहे.

त्यानुसार जून २०२४ अखेर संपणाऱ्या तिमाहीची नमुना ईआर-१ मधील त्रैमासिक सांख्यिकी माहिती सकंलनाचे काम जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाद्वारे ऑनलाईन पध्दतीने १ जुलै २०२४ पासुन सुरू झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व आस्थापनांना यापूर्वीच युजर नेम व पासवर्ड देण्यात आला आहे. त्या युझर आयडी/ पासवर्डचा वापर करून प्रत्येक आस्थापनांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर लॉगिन करून आपली अचूक माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर करावी. सदरील जून २०२४ अखेरचे तिमाही  विवरणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ आहे, याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी व हे तिमाही विवरणपत्र विहीत मुदतीत ऑनलाईन पध्दतीने सादर करावे.

प्रत्येक आस्थापनेने आपला नोंदणी  तपशील देखील आवश्यक ती सर्व माहिती नोंदवून घ्यावी किंवा नोंदणी केलेली असल्यास तात्काळ अद्यायावत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे. यासंदर्भात कोणत्याही स्वरुपाचे सहकार्य अथवा माहिती आवश्यक असल्यास chandrapurrojgar@gmail.com/ , asstdiremp.chandrapur@ese.maharashtra.gov.in यावर तसेच दुरध्वनी क्र.०७१७२-२५२२९५ वर उद्योजक नोंदणी क्रमांक व इतर सर्व आवश्यक तपशीलासह संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss