Latest Posts

गडचिरोली तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबध्द : आमदार डॉ. देवराव होळी

– १२.५० कोटी रुपयाच्या विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली तालुक्याचा व संपूर्ण विधानसभेच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांचा नेतृत्वात विविध योजनांमधून आपण निधी खेचून आणला असून या पुढे सुद्धा विकास कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांनी पोरला, काटली, नगरी, साखरा येथे केले.

यावेळी भाजपचे जिल्हा सचिव तथा माजी उपसभापती विलास दशमुखे, शिवणी ग्रामपंचायतचे सदस्य हेमंत बोरकुटे उपस्थित होते. यावेळी पोरला, नगरी, काटली, साखरा या गावातील विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पार पडले.

यावेळी आ. डॉ. होळी म्हणाले की, वसा पोरला उपसा सिंचन योजना येणाऱ्या अधिवेशनामध्ये मंजूर होणार असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा लाभ होईल व शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. तसेच ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असुन ७५ वर्षांमध्ये कधीही एवढा मोठा निधी या गावांना मिळालेला आहे. तो आपण मिळवून दिला याचा सार्थ आनंद आपणाला असून त्यापुढे सुद्धा विकासासाठी सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे सुद्धा आ. डॉ. देवराव होळी यांनी म्हटले.

सदर कामे ही लेखाशीर्ष २५१५, ३०५४, जनरल बजेट, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, जिल्हा वार्षिक योजना, जल जीवन मिशन, व आमदार फंड या अंतर्गत पोरला येथे ५.५० कोटी, नगरी येथे ४ कोटी, काटली येथे २ कोटी, साखरा येथे १ कोटी अशा एकूण १२.५० कोटी रुपयाच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे संचालक बापूजी फरांडे, ग्रामपंचायत सदस्य तथा बाजार समिती संचालक मुखरूर्जी लाडवे, माजी सरपंच दादाभाऊ साळवे, रामदास आखाडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल चापले, माजी तंटामुक्ती समिती अध्यक्ष भास्कर मेश्राम, संतोष दशमुखे, बुथ प्रमुख अशोक चापले, पांडूजी भोयर, बोवाजी बांनबले, मनोज किरमिरे, नगरी ग्रामपंचायतच्या सदस्य अनु वाघरे, भाविका बारसागडे, चिंतामणी धंदरे, काटली ग्रामपंचायत सरपंच उंदीरवाडे, उपसरपंच पार्वता खेडेकर, गजानन बांनबले, सुरेश ठाकरे, अमोल ठाकरे, सुनील डोईजळ, साखरा ग्रामपंचायतचे सरपंच पुण्यवान सोरते, उपसरपंच अर्चना बोरकुटे, ग्रामपंचायत सदस्य चौधरी, हूलके यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. यावेळी संपर्क ते समर्पण अभियानांतर्गत विकास कामांच्या योजनांचे फलक वितरित करण्यात आले.

Latest Posts

Don't Miss