– शासनाने जाहिर केले होते एकुण ०२ लाख रूपयांचे बक्षिस.
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : शासनाने सन २००५ पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६७९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. आज ०२ डिसेंबर २०२४ रोजी जहाल महिला माओवादी तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे (२८), रा. नैनेर, ता. अहेरी, जि. गडचिरोली हिने नक्षल सप्ताह दरम्यान गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले.
आत्मसमर्पित महिला माओवादी सदस्याबाबत माहिती –
तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे
दलममधील कार्यकाळ –
– सन २०१६ मध्ये अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन २०१८ पर्यंत कार्यरत होती.
– सन २०१८ पासून आजपर्यंत भामरागड दलममध्ये कार्यरत होती.
कार्यकाळात केलेले गुन्हे –
तारा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे हिच्यावर आजपर्यंत एकुण १२ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ०८ चकमक, ०३ खून, व ०१ इतर गुन्ह्यांचा समावेश आहे.
चकमक-०८ –
– सन-२०१६ मध्ये कवठाराम जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
– सन-२०१७ मध्ये शेडा-किष्टापुर जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
– सन-२०१७ मध्ये आशा-नैनेर जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
– सन २०१९ मध्ये मोरमेट्टा जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
– सन २०२० मध्ये आलदंडी जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
– सन २०२० मध्ये येरदळमी जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
– सन २०२१ मध्ये काकुर माड एरिया (छ.ग.) जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
– सन-२०२३ मध्ये हिक्केर जंगल परिसरात सुरक्षादलासोबत झालेल्या चकमकीमध्ये प्रत्यक्ष सहभाग.
खून-०३ –
– सन २०२१ मध्ये मोजा कोठी येथील एका निरपराध इसमाच्या खुनामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
– सन २०२३ मध्ये मिळदापल्ली येथील एका निरपराध इसमाच्या खुनामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
– सन २०२४ मध्ये ताडगाव येथील एका निरपराध इसमाच्या खुनामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
इतर गुन्हे-०१ –
सन २०२२ मध्ये कापेवंचा राजाराम (खां) येथे दरोड्यामध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.
आत्मसमर्पित होण्याची कारणे –
– नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
– माओवादी दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.
– दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वतःसाठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.
– वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
– खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात.
– चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.
शासनाने जाहिर केलेले बक्षिस –
महाराष्ट्र शासनाने हिचेवर ०२ लाख रुपयाचे बक्षिस जाहिर केले होते.
आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षिस –
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन तारा ऊर्फ शारदा ऊर्फ ज्योती दस्सा कुळमेथे हिला एकुण ४.५ लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते आतापर्यंत एकुण ३१ जहाल माओवायांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा पोलीस उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली, शंभु कुमार, कमांडण्ट ०९ बटा. सिआरपीएफ व सुमीत वर्मा, उप-कमांडण्ट इंड सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणाऱ्या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.
