Latest Posts

नाशिक महामार्गावर मालवाहतूक ट्रक आणि खाजगी बसचा अपघात

  • मंचर रुग्णालयात उपचार सुरू, बसच्या पुढील भागाचे झाले नुकसान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे (Pune): पुणे-नाशिक महामार्गावर नंदी चौकात मंगळवार, ११ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता मालवाहतूक ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला. यामध्ये बसमधील चाळीस प्रवाशांपैकी २० ते २२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना त्वरित मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या तपशिलांनुसार, पुण्यावरून नागपूरकडे जात असलेल्या खाजगी बसने नाशिक महामार्गावर अचानक ब्रेक लावलेल्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. या अपघातामुळे बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून, बसमधील अनेक प्रवासी, विशेषत: पुढील आसनांवर बसलेल्या भाविक जखमी झाले आहेत. जखमी सर्व प्रवासी नागपूर येथील असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या नेतृत्वाखाली एक पथक रुग्णालयात उपस्थित होते. डॉ. विवेकानंद फसाले आणि डॉ. अश्विनी घोडे यांच्या पथकाने जखमींची तपासणी केली असून, त्यांची प्रकृती सध्या सुधारत असल्याचे सांगितले आहे.

ही घटना देवदर्शनासाठी निघालेल्या दोन बसच्या असताना घडली, जे आळंदी येथून भीमाशंकरकडे जात होत्या. पोलिसांनी अपघाताच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.

Latest Posts

Don't Miss