विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Napur) : मध्य रेल्वेने नागपूर ते पुणे यादरम्यान द्वि- साप्ताहिक एसी सुपर फास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे-
०१२०१ नागपूर-पुणे सुपर-फास्ट एसी स्पेशल २८ सप्टेंबर २०२४ ते ०७ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत प्रत्येक सोमवार आणि गुरुवारी १९.४० वाजता नागपूरहून सुटेल आणि पुण्याला दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल.
०१२०२ पुणे- नागपूर सुपर- फास्ट एसी स्पेशल पुण्याहून मंगळवार आणि शुक्रवारी २९ ऑक्टोबर २०२४ ते ०८ नोव्हेंबर २०२४ दरम्यान १५.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता नागपूरला पोहोचेल.
थांबे : वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड चोर मार्ग आणि उरुळी.
संरचना : १८ AC ३ टियर +२ जनरेटर कार.
आरक्षण : ०१२०१/०१२०२ एसी स्पेशलसाठी विशेष शुल्कावर बुकिंग ०६ सप्टेंबर २०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर उघडेल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
