विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर(Nagpur): नागपूरच्या दृष्टीबाधित पॅरा जलतरणपटू कंचनमाला पांडे यांनी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णपदकं जिंकून महाराष्ट्राचं नाव उजवलं आहे. कंचनमालाने ५० मीटर बॅकस्ट्रोक, ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक अशा तीन इव्हेंट्समध्ये सुवर्णपदकं मिळवली, आणि यासोबतच महाराष्ट्राचे आणि नागपूरचेही मान उंचावले.
कंचनमाला पांडे S-११ वर्गात येणाऱ्या तैराक आहेत, ज्यांना पूर्ण किंवा जवळपास दृष्टीचा अक्षमत्व आहे. त्या आरबीआयमध्ये (Reserve Bank of India) क्लास-I ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या यशामध्ये प्रशिक्षक डॉ. प्रवीण लामखडे (NSNIS) आणि विशाल चांदूरकर (ASCA Level-५) यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
२०१७ मध्ये कंचनमालाने वर्ल्ड पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये २०० मीटर स्पर्धेत स्वर्णपदक जिंकून इतिहास रचला. त्याचबरोबर, त्यांच्या करिअरमध्ये एकूण १२० पदके असून, त्यात ११५ सुवर्णपदके आहेत. कोविडनंतर मातृत्वाच्या काळातही त्यांनी जलतरणात कमबॅक करत राष्ट्रीय स्पर्धेत तीन सुवर्णपदकं मिळवली.
कंचनमालाच्या या यशाने त्यांनी पॅरा स्पोर्ट्समध्ये एक नवा आदर्श निर्माण केला आहे, जो आगामी पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे.
