Latest Posts

नागपुर : हिट ॲण्ड रन अपघात आणखी दोघांचा मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : उपराजधानीत हिट ॲण्ड रनच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी पुन्हा दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा नाहक बळी गेला. कपिलनगर व वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात झाले.

भावेश रवींद्र भरणे (२७) हा दुपारी दुचाकीने कामगारनगर चौकाजवळील पेट्रोल पंपासमोरून जात असताना टिप्परने त्याला जोरदार धडक दिली. टिप्परचालक राधेश्याम रहांगडाले (५३) हा वेगाने टिप्पर चालवत होता व त्यामुळे भावेश खाली पडला. राधेश्याम घटनास्थळावरून फरार झाला. भावेशला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

रस्ता ओलांडताना गेला जीव –
प्रकाश अशोक महंत (२९) हे सायंकाळी तरोडी खुर्द येथील उड्डाणपुलावर दुचाकी उभी करून पायी रस्ता ओलांडत होते. अज्ञात वाहनचालकाने त्याला धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. प्रकाशला डॉक्टरांनी मृत घोषित केले. सोमवारी नागपुरात एका स्कूल बसने दिलेल्या धडकेत रत्नाकर रामचंद्र दीक्षित (६३) यांचा मृत्यू झाला होता.

Latest Posts

Don't Miss