विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील मोवाड ता. नरखेड येथे बुधवारी घडली आहे.
विजय मधुकर पाचोरी (६२), माला विजय पाचोरी (५४), डिंकू विजय पाचोरी (४०) व गणेश विजय पाचोरी (३७) अशी मृतांची नावे आहेत. या सर्वांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ७:३० ला उघडकीस आली. मोवाड येथील वॉर्ड क्र ५ मधील खोब्रागडे यांच्या कडे पाचोरी कुटुंब भाड्याने राहत होते. सकाळी शेजाऱ्याना हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी नरखेड पोलीस दाखल झाले असून पुढील कारवाई करीत आहे.
आत्महत्यांचे कारण अद्यापही समजले नाही. मृतकापैकी एक हा मध्यप्रदेशातील पांढूर्णा येथे आर्थिक घोटाळ्यातील आरोपी होता. काही दिवसांपूर्वीच तो जमीनावर बाहेर आला होता, अशी माहिती आहे.
