– जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिटची सुरुवात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यातील ० ते १८ वर्षे वयोगटातील जन्मजात बालके/विध्यार्थी यांमध्ये जन्मता असणारे आजार शारीरिक व बौद्धिक विकासात्मक विलंब / वाढीतील दोष, तसेच इतर बालपणातील आजार यांच्या पुढील तपासणी, निदान निश्चिती, थेरपी व उपचार आपल्या जिल्ह्यामध्येच उपलब्ध असावे, असे जिल्हाधिकारी यांचे मानस आहे. करिता जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत पेडीऑट्रीक फिजिओथेरपी (Pediatric Physiotherapy) युनिट जिल्ह्यातील उपलब्ध पेडीऑट्रीक विभाग डीईआयसी (डीस्ट्रीक्त अर्ली इंटरवेन्शन सेंटर) जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे सुरु करण्यात आले आहे.
सदर पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट से २७ सप्टेंबर २०२३ रोजी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष व ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते उदघाटन झाले. या प्रसंगी जिल्ह्यातील आ. देवराव होळी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय मीना, आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. खंडाते, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किलनाके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धुर्वे यांच्या उपस्थितीत पार पडले. दरम्यान डीईआयसीतील देण्यात येणाऱ्या सेवा उपलब्ध सुविधांबाबत डीईआयसी व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे, यांनी मान्यवरांना माहिती दिली.
कार्यक्रमाकरिता डीईआयसीतील अधिकारी / कर्मचारी यांनी मेहनत घेतली दरम्यान जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथील बालरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फार्मसी अधिकारी, अधिसेविका, अधिपरिचारिका, परिसेविका, कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
डीईआयसी येथील उपलब्ध जागेमध्ये पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट बनविण्यात आली. यामध्ये बालकांना आकर्षित रंगरंगोटी ईन्टेरीअर्स / इन्फ्रास्ट्रक्चर करण्यात आली आहे. त्यांना खेळीमेळीचा सहवास लाभावा तसेच बालकांची मानसिक आरोग्यस्थिती व्यवस्थापित व्हावी. ज्यामुळे बालकांच्या मनातील दवाखाना नावाची भीती निघावी व थेरेपी करिता अनुकूल वातावरण मिळावा यामागील हा हेतू. त्याचप्रमाणे फिजिओथेरेपीकरिता बालकांच्या विकासात्मक वाढीसाठी आवश्यक वेगवेगळे साहित्य/ उपकरणे उपलब्ध करण्यात आले आहे.
नियमित फिजिओथेरेपी मुळे बालकांमध्ये पुनर्वसन होऊन आत्मविश्वास परत मिळण्यास मदत होऊ शकते. थेरेपी स्नायुमधील बदलांचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यास मदत करते जसे कि, स्रायू कडक होणे, सांधे आन्कुचन स्नायूंची ताकद, लवचिकता, पोश्चर मोटर कौशल्य, गतिशीलता, दैनंदिन जीवनातील कार्यात्मक स्वातंत्र आणि एकूण जीवनाच्या गुणवत्तेत सुधारते. अनेकदा स्पेशल एज्युकेशन, स्पिच थेरेपी आणि आकुपेशनल थेरेपीचे एकत्रीकरण जीवन कौशल्यामध्ये प्रगती करते.
प्रत्यक्षात फिजिओथेरेपीचे कौशल्य अंतहीन आहेत, ते कोणत्याही स्थितीवर उपचार करू शकतात ज्यामुळे हालचाल, संतुलन किंवा समन्वय, हाताची पकड बसणे, खेळतांना हाताचा वापर, पोस्चरल सल्ला, स्ट्रेचिंग व्यायाम, संतुलित व्यायाम तसेच सामाजिक परस्पर संवादाच्या संधी, आर्थोपेडिक किंवा क्रीडा दुखापतीचे वैद्यकीयदृष्ट्या निदान ई समाविष्ट आहेत तसेच बालरोग फिजिओथेरेपी वय योग्य हस्तक्षेप करण्यास सक्षम आहे जसे कि बाळ उशिरा चालणे, उशिरा मान धरणे, वेळेत न रांगणे, हाता-पायाची कमी हालचाल, बाळाला उभा राहण्यास अडचण, सरळ चालण्यास अडचण ई गोष्टी बालकाच्या वयानुरुप नसल्यास लवकर हस्तक्षेप आवश्यक आहे.
करिता नागपूर येथील जेष्ठ बालरोग फिजिओथेरेपीस्ट तथा पुनर्वसन सल्लागार डा. मीनाक्षी वानखेडे इतर थेरेपिस्टसह दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवड्यातील शुक्रवारला पेडीऑट्रीक फिजिओथेरपी युनिट, डीईआयसी येथे उपलब्ध राहणार आहेत. दरम्यान बालकांची तपासणी, मुल्यांकन, गरजेनुसार थेरेपिचे नियोजन, थेरेपीमधील अल्प दीर्घ उदिष्टे ठरविणे व बरेचकाही बाबींचा नियोजन आहे. तसेच दर सोमवार-मंगळवार-बुधवार प्रशिक्षित थेरेपीस्टकडून नियमित फिजिओथेरेपी सत्रे असणार आहेत.
तरी जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी जास्तीत जास्त बालके / विध्यार्थी यांनी लाभ घ्यावा, असे आव्हाहन केले आहे. लाभार्थी- सांधे घट्ट होणे, चालायला उशीर, मोटर विलंब (ग्रास आणि फाईन), आकलनाच्या समस्या, स्रायू कमकुवत होणे, डीले माईलस्टोन, मेंदूचा पक्षाघात, डाऊनसिंड्रोम, अतिचंचलता (एडीएचडी), स्वमग्न(आटीझम), आर्थोसमस्या, वाढीतील दोष, विकासात्मक विलंब व इतर शारीरिक समस्या ई बालकांना संदर्भित करावे.
