Latest Posts

समान व असमान निधी योजनांसाठी शासनमान्य ग्रंथालयात प्रस्ताव सादर करावे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया (Gondia) : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान निधी व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसहाय्याच्या विविध योजना ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्फत राबविण्यात येतात.

सन २०२४-२५ साठी विविध समान व असमान निधी योजनांचा लाभ घेण्यासाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांकडून विहित नमुन्यात प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. त्या संदर्भातील नियम, अटी व अर्जाचा नमुना प्रतिष्ठानच्या www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक ग्रंथालयांनी अर्जाचा नमुना संकेतस्थळावरुन उपलब्ध करुन घ्यावा.

समान निधी योजना – 

इमारत बांधकाम व विस्तार अर्थसहाय्य योजना २५ लाख रुपये. समान निधी योजनेंतर्गत इतर योजनांचा लाभ केंद्रीय पध्दतीने देण्यात येत असल्यामुळे इतर योजनेसाठीचे प्रस्ताव सादर करु नयेत.

असमान निधी योजना –

ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व विस्तार यासाठी अर्थसहाय्य- फर्निचर खरेदी ४ लाख रुपये व इमारत बांधकाम १० ते १५ लाख रुपये. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ‘ज्ञान कोपरा’ विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य- २ लाख ५० हजार रुपये व विशेष अर्थसहाय्य आधुनिकीकरण २ लाख रुपये. महोत्सवी वर्ष जसे-५०, ६०, ७५, १००, १२५, १५० वर्ष साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य- ६ लाख २० हजार व इमारत विस्तार १० लाख रुपये. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य- १.५० लाख/ २.५० लाख/ ३.०० लाख रुपये. बाल ग्रंथालय व राजा राममोहन रॉय ग्रंथालय ‘बाल कोपरा स्थापन’ करण्याकरीता अर्थसहाय्य- ६ लाख ८० हजार रुपये.

योजनेसाठी करावयाचा अर्ज – 

वरील योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी प्रतिष्ठानचे www.rrrlf.gov.in हे संकेतस्थळ पहावे. आवश्यकता असल्यास जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ग्रंथालयांनी वरील पैकी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी/हिंदी भाषेत चार प्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss