Latest Posts

दिवारलेखन अभियानाअंतर्गत गडचिरोली येथे कमल फुलवितांना खासदार अशोक नेते

– गडचिरोली येथे व्हिडिओ व्हॅन अंतर्गत विकसित भारत संकल्पाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनेचे परिपत्रकांचे वितरित 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : दिवार लेखन या अभियान अंतर्गत फिर एक बार मोदी सरकार असे दिवार लेखांच्या माध्यमातून गडचिरोली शहरातील शाहूनगर येथे खा.नेते यांच्या हस्ते दिवार लेखन करण्यात आले. तसेच खासदार अशोक नेते यांनी गडचिरोली येथे व्हिडिओ व्हॅन अंतर्गत विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनेचे परिपत्रकांचे वितरित सुद्धा खा.नेते व पदाधिकाऱ्यांसह करण्यात आले.

फिर एक बार मोदी सरकार ….. एक विजयाचा विश्वास व संकल्प करत भिंतीवर कमळ फुलवून दाखवितांना खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनू.जनजाती मोर्चा चे अशोक नेते यांनी दिवार लेखन केले व विकसित भारत संकल्प यात्रेच्या व्हिडिओ व्हँन अभियानात सहभागी झाले.

याप्रसंगी प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, गडचिरोली विधानसभा विस्तारक दामोदर एरिगेला, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सुधाकर पेटकर, ओबीसी नेते तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल, भाजपा नेते कमलाकर सिद्धमशेटीवार, देवराव कोठेवार, जिल्हा सचिव अनिल कूनघाडकर, विनोद देवोजवार, केशव निंंबोड,दतु माकोडे, अविनाश विश्रोजवार, विलास नैताम, दतु सुत्रपवार, तुळशीदास भुरसे, गणेश नेते, प्रशांत अल्लमपटलावार, तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss